अंतरगी कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांना उत्तर दिलं होतं.
चित्रा वाघ यांनी “थोबडवेन” असं म्हटल्यानंतर उर्फीने दिल्लीतील अपघाताचा व्हिडीओ शेअर करत भाजपाशी संबंधित असलेल्या आरोपीवर कारवाई करणार का?, असा सवाल त्यांना केला होता. त्यानंतर उर्फीने चित्र-विचित्र बिकिनीमधील व्हिडीओही तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला होता. आता उर्फीने पुन्हा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
उर्फीने भगव्या रंगाचे अतरंगी कपडे परिधान केले आहेत. ‘पठाण’ चित्रपटातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर तिने व्हिडीओ बनवला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा>> “…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला
एकाने कमेंट करत “वाद निर्माण करुन चर्चेत राहण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घातले आहेस का?”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “प्रसिद्ध होण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत. तू तर पॉर्नस्टारला पण मागे सोडलं”, अशी कमेंट केली आहे. “हाच रंग मिळाला होता का?”, असंही एका युजरने म्हटलं आहे. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. विचित्र कपड्यांमुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं.