सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या बरीच चर्चेत आहे. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या पोस्टमधून तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण या व्हिडीओ आणि फोटोमधील तिच्या टॉपलेस लूकमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता उर्फीने यावर प्रतिक्रिया दिली असून स्वतःची तुलना काली मातेशी केली आहे.

उर्फी जावेदनं दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती सोफ्यावर बसलेली दिसत आहे. एका हाताने तिने स्तन झाकले आहेत. दुसऱ्या हाताने एखाद्या मोठ्या आकाराच्या लाडूप्रमाणे दिसणारा गोड पदार्थ खात उर्फी कॅमेराकडे पाहून पोज देत आहे. या व्हिडीओमध्ये पणत्यांनी सजवलेलं ताटही बाजूच्या टेबलवर ठेवलेलं दिसत आहे. पण या व्हिडीओनंतर अनेकांनी उर्फी भारतीय संस्कृती संपवत असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं होतं.

Ranveer Allahbadia Comment Controversy
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत वाढ, आक्षेपार्ह वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल, बजावले समन्स
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
VIRAL VIDEO Nepal School Students Raise Funds For Classmate Netizens Say Cant Control Tears
“मित्र असावे तर असे!”, मैत्री कशी जपावी हे या चिमुकल्यांकडून शिकले पाहिजे, Viral Video एकदा बघाच…
ajanta caves woman sculptures
दर्शिका : अजिंठ्याला जाऊनही बायकाच पाहायच्या?
Chunabhatti viral video
Video: जिगरबाज महिला पोलिसाचं धाडस, मृत्यूच्या जबड्यातून प्रवासी महिलेला वाचवलं; काळाजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ पाहिलात का?
Ladies group dance on Gan Bai Mogra Ganachi Saree marathi song video goes viral on social media
“गण बाय मोगरा गणाची साडी” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल ‘हौस असेल तर वेळ मिळतो’
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…

आणखी वाचा-दिवाळी पार्टीमध्ये अचानक रोमँटिक झाला कपिल शर्मा, सर्वांसमोर पत्नीला केलं Kiss अन्…

सामान्यपणे उर्फीच्या तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं जातं. मात्र दिवाळीनिमित्त उर्फीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कारण या व्हिडीओमध्ये उर्फी टॉपलेस असल्याचं दिसत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना उर्फीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवरुन लोकांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अशाप्रकारे टॉपलेस होण्याची गरज नव्हती असं अनेकांनी म्हटलं होतं. यावर उर्फीने प्रतिक्रिया देताना कालीमातेचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा- टॉपलेस Video शेअर करत उर्फी जावेदने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; चाहते संतापून म्हणाले, “घरच्यांसमोर पण अशीच…”

उर्फी जावेदनं काली मातेचा फोटो शेअर करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “मी भारतीय संस्कृती नष्ट करत आहे, असे म्हणणार्‍यांनी आधी नीट अभ्यास करावा. भारतीय संस्कृतीत महिलांच्या शरीराकडे कधीही फक्त वासनेच्या भावनेने बघितले गेले नव्हते. मुघल आक्रमणानंतर महिलांना त्यांचे शरीर झाकणे भाग पडले. आपण महिलांची, त्यांच्या शरीराची पूजा करायचो. महिलांचा आदर केला जात असे. ज्यांना भारतीय संस्कृती बद्दल शिकायचं आहे त्यांना शिकवण्यात मला आनंदच आहे. कारण, तुमच्यासारख्या अर्धवट ज्ञान असलेल्यांच्या तुलनेत मी नक्कीच जास्त अभ्यास केला आहे.” दरम्यान उर्फी जावेदची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

Story img Loader