सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू आहे. उर्फीच्या चित्रविचित्र कपडे घालण्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला. उर्फी चित्रा वाघ यांना तिच्या सोशल मीडियावरुन उत्तर देत आहे. चित्रा वाघ यांनी आता पुन्हा उर्फीला सुनावलं आहे.
“व्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्वैराचार नाही. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक ठिकाणी फिरताना कपड्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. मुलीही जीन्स, टॉप, स्कर्ट घालतात. पण कोणीही उघडंनागडं फिरत नाही. फॅशन व नंगानाच यात फरक आहे. रस्त्यावर अशा कपड्यांत उर्फी फिरत आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
हेही वाचा>> Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!
चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत “माझ्यासमोर आली तर थोबडवेन”, असं भाष्य केलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा तिला धमकीवजा इशारा दिला आहे. “पोलीस व सरकार त्यांचं काम करत आहेत. आम्हीही आमच्या परीने सांगितलं आहे. ऐकलं तर ठीक पण जर नाही ऐकलं तर मी काय करेन हे आधीच सांगितलं आहे”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा>> “सल्ले द्यायचं असतील, तर…”, चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर; रुपाली चाकणकरांवरही टीकास्त्र!
चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही उर्फी जावेद प्रकरणावरुन टीका केली आहे. तसंच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.