सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन”, असं धमकीवजा विधानही त्यांनी केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे हल्ला होण्याची भीती उर्फीने व्यक्त केली आहे. यासंदर्भात महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याबाबत तक्रारीचं पत्र लिहित सुरक्षा पुरवण्याची मागणीही उर्फीने केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे तक्रार केल्यानंतर उर्फीने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने “आत्महत्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. संयम ठेवा एक दिवस तुमचा मृत्यू होईल”, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “माझ्यावर हल्ला होऊ शकतो”, उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार, महिला आयोगाला पाठवलं पत्र!

हेही वाचा>> …अन् भर पार्टीत शरद केळकरला पत्नीने केलं किस, व्हिडीओ व्हायरल

उर्फीने यापूर्वीही आत्महत्येची भीती व्यक्त केली होती. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राजकारणी आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा उर्फीने यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

हेही वाचा>> ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी उर्फीला नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. शनिवारी (१४ जानेवारी) उर्फीने आंबोली पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदवला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed controversy bjp leader chitra wagh actress tweet regarding suicide goes viral kak