भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यावर आक्षेप घेतल्याने चर्चेत आहे. गेले कित्येक दिवस उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांतही तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतही या प्रकरणावर भाष्य केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रा वाघ यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात व बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. “हास्यजत्रेतील अभिनेत्री व चित्रपटातील एका अभिनेत्याने न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावर तुमचा आक्षेप नव्हता का?”, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला गेला. यावर उत्तर देताना त्यांनी मला याबाबत माहीत नाही असं म्हटलं.

हेही वाचा>> उर्फी जावेद मुस्लीम असल्याने भाजपाकडून लक्ष्य? चित्रा वाघ म्हणाल्या, “नग्नावस्थेत नाच असं…”

चित्रा वाघ म्हणाल्या, “मला याबाबत माहीत नाही किंवा माझ्याकडे या विषयावर काही आलेलंही नाही. माझ्या विषयांवर मी लक्ष केंद्रीत करते. ज्या गोष्टी समोर येतात, त्याबाबत मी नेहमीच बोलते. मनोरंजन विश्वाशी माझा संबंध नाही. उर्फीचा व्हिडीओही नऊ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पाठवला नसता, तर ही उर्फी कोण आहे? हे मला माहितच झालं नसतं. ज्या गोष्टी पटत नाहीत, त्याबाबतही मी बोलते. उर्फी याआधीही तोकड्या कपड्यांत फिरत होती. आताही फिरतेय, म्हणून मी याबाबत बोलतेय”.

हेही वाचा>> “तिला तुरुंगात…”, उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांचं विधान

उर्फी जावेद-चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?

मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन”, असं विधानही त्यांनी केलं होतं. त्यानंतर उर्फीने नंगानाच सुरुच राहणार असं म्हणत त्यांना प्रत्युतर दिलं होतं. उर्फी व चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युदध सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. त्यानंतर उर्फीने शनिवारी (१४ जानेवारीला) तिचा जबाब नोंदवला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed controversy bjp leader chitra wagh on actress vanita kharat and actor ranveer singh nude photoshoot kak