विचित्र कपडे परिधान करुन कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधीव वाद आणखीनच चिघळला आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. दरम्यान उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू असताना मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत चित्रा वाघ यांनी पुन्हा आपलं मत मांडलं आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर “उर्फीला थोबडवेन” असंही त्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकरणावर उर्फीने सोशल मीडियाद्वारे उत्तर देण्यास सुरुवात केली. आता ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्र वाघ यांनी आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, “कालपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे असं मला कळालं. कारण मी तर प्रवासामध्ये आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगते की, मी वकील नाही. पण या प्रकरणात काय होऊ शकतं आणि काय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही तुम्हाला जाब विचारणारं महाराष्ट्रात कोणीतरी आहे हा मला संदेश द्यायचा आहे.”
आणखी वाचा – उर्फी जावेद मुस्लीम असल्याने भाजपाकडून लक्ष्य? चित्रा वाघ म्हणाल्या, “नग्नावस्थेत नाच असं…”
“आज जर हिला (उर्फी जावेद) थांबवलं नाही तर अजून दहा जणी नग्न फिरतील. तेव्हा आपण काय करायचं? आपल्याला हे अभिप्रेत आहे का? मी पुन्हा एकदा सांगत आहे की, विरोध व्यक्तीला नाही तिच्या विकृतीला आहे. याला धर्म व आणखी काय काय बोलून वेगळा रंग आणायचा प्रयत्न करू नका.” आता हे प्रकरण आणखीन किती वाढणार हे येणारा काळच सांगू शकेल.