सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, उर्फी समोर आली तर थोबडवणार, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा>> Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन सातपुते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.

हेही वाचा>> सोनू सूदने केलं प्राजक्ता माळीचं कौतुक, म्हणाला…

“चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केल्याचा मेल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाठवला आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती त्यांना करणार आहे”, असंही उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितलं.

हेही वाचा>> ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

“उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed controversy lawyer filed complaint againts bjp leader chitra wagh kak