मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपडे आणि विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. वायर, मोबाईल, सिम कार्ड, दगड अशा कोणत्याही वस्तूंचा वापर करून बनवलेले कपडे उर्फी परिधान करते. पण यावेळी मात्र, तिला विचित्र कपडे परिधान करणं महागात पडल्याचं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे उर्फीची पोलिसांनी चौकशी केली आहे. उर्फी सध्या दुबईमध्ये आहे. यावेळी तिने स्वतःच बनवलेल्या एका पोशाखात इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ शूट केला. पण हा प्रकार दुबईतील लोकांना आवडली नाही आणि त्यांनी याबद्दल तक्रार केली. मग काय, पोलीस पोहोचले आणि उर्फीला चौकशीसाठी नेलं.
उर्फी जावेदने बीचवर घातले ‘असे’ कपडे की पाहणारेही झाले अवाक्, Video Viral
‘फिल्मी बीट’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फी जावेद तिच्या आगामी काही प्रोजक्ट्सच्या शूटिंगसाठी दुबईला गेली आहे. इथे तिने नेहमीप्रमाणे विचित्र कपडे परिधान करत काही व्हिडीओ शूट केले, पण तिथल्या लोकांना ते रुचलं नाही आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून उर्फीची चौकशी केली जात आहे. खरं तर उर्फी सार्वजनिक ठिकाणी फिरतानाही तिने स्वतः डिझाईन केलेले कपडे परिधान करते. पण काही देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसे कपडे परिधान करावे, याबाबत काही नियम असतात. त्या नियमांचं पालन न केल्यामुळे नागरिकांनी उर्फीविरोधात तक्रार दिल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, उर्फी जावेदला तिच्या कपड्यांमुळे याआधीही अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिला बऱ्याचदा जीवे मारण्याच्या धमक्याही येतात. पण ती मात्र कुणालाही न घाबरता बिंदासपणे तिला हवे ते कपडे परिधान करते. यावेळी दुबईत तिला तिच्या मनाप्रमाणे कपडे घालणं भोवल्याचं दिसतंय. याच महिन्याच्या सुरुवातीला उर्फी जावेद फॅशन आणि कपड्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर अश्लीलता पसरवते असा आरोप करत एका वकिलाने ११ डिसेंबरला तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केली होती.
FIFA World Cup लूकवरून ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोण म्हणाली, “तो ड्रेस खूपच…”
त्याआधीही उर्फीच्या विरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप उर्फीवर करण्यात आला होता. एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाय हाय ये मजबूरी’ या म्युझिक व्हिडीओमुळेही ती कायदेशीर अडचणीत सापडली होती. गाण्यात रिव्हिलिंग कपडे परिधान केल्याने तिला कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागला होता.