सोशल मीडियावर काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहे. उर्फीला या आधी अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केलं गेलं आहे. पण आता ती इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हातात मेकअप किट घेऊन फोटोशूट करताना दिसत आहे. पण केस फ्लॉन्ट करण्याच्या नादात तिचा तोल जातो. पण ती खाली पडता- पडता वाचते. उर्फीला असं पडताना पाहून तिचा फोटोग्राफरही जोरजोरात हसू लागतो. पण हा व्हिडीओ शेअर करुन उर्फीनं नेटकऱ्यांना ट्रोलिंगसाठी नवी संधीच दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने त्याच्या कॅप्शन मध्ये लिहिलं, ‘पडता- पडता वाचतो त्याला काय म्हणतात. काही कल्पना आहे का?’
उर्फी जावेदनं तिच्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्या आहे. काही युजर्सनी याला ओव्हर अॅक्टिंग म्हटलंय तर काहींनी ती नाटक करत असल्याचं म्हटलं आहे. पण एका युजरनं तर तिच्या या व्हिडीओवर चक्क ‘नशा करणं बंद कर मग असं पडणं आपोआप बंद होईल.’ अशी कमेंट केली आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/01/urfi.jpg)
दरम्यान अशाप्रकारे ट्रोल होण्याची उर्फीची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण याचा तिला फारसा काही फरक पडत नाही. अलिकडेच तिनं यावर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती, ‘मला लोक ट्रोल करतात पण त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही कारण माझ्यासाठी ते माझ्याबद्दल बोलतात, मला नोटीस करतात हे महत्त्वाचं आहे. बिग बॉस ओटीटीनंतर लोक मला ओळखायला लागले आहेत. हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’