अलीकडेच आशियात गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आलेल्या लोकांची यादी जाहीर झाली आणि या यादीत बॉलिवूडच्या कलाकारांनाही स्थान देण्यात आलं आहे. चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील सर्वाधीक सर्च झालेल्या लोकांची ही यादी तयार केली आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर यांसारख्या अभिनेत्रींना स्थान मिळालं आहे. पण यांना देखील मात देत एका अभिनेत्रीनं या यादीत त्यांच्याही वरचं स्थान मिळवलं आहे.
आशियात गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदनं कंगना आणि कियारा यांना मागे टाकत त्यांच्याही वरच स्थान पटकावलं आहे. सोशल मीडियावर आपल्या फॅशन आणि आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी आता बरीच प्रसिद्ध झाली आहे. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फीला सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. उर्फीला बिग बॉस ओटीटीमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरीही ती २०१६ पासून टीव्हीसृष्टीत काम करत आहे.
उर्फी जावेदनं २०१६ मध्ये ‘बड़े भइया की दुल्हनिया’मध्ये अवनी पंत ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’ या मालिकेतही दिसली होती.
पाहा व्हिडीओ –
याशिवाय ‘मेरी दुर्गा’ या स्टार प्लसवरील मालिकेत तिने आरतीची भूमिका साकारली होती. तर ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये तनीषा चक्रवर्तीच्या भूमिकेतही ती दिसली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर एवढी सक्रिय झाली की आता तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि ती आपल्या अतरंगी ड्रेसमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. Most Searched Asian List 2022 मध्ये उर्फी जावेद ५७ व्या स्थानावर आहे.