‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आणि असे कपडे परिधान केल्यामुळे ती चर्चेत राहते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उर्फीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. उर्फी १५ वर्षांची असताना तिचा फोटो हा पॉर्न साइटवर लीक झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्फीने नुकतीच आरजे अनमोल आणि अमृता राव यांच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी उर्फीने हा खुलासा केला आहे. “मी १५ वर्षांची असताना ऑफ शोल्डर टॉप परिधान केला होता आणि तेव्हा मी लखनऊमध्ये राहत होते. त्यावेळी लखनऊमध्ये असे कपडे कोणी परिधान करत नव्हते आणि एवढचं काय तर असे कपडे मिळतही नव्हते. मी घरीच तसा टॉप बनवला होता. तो टॉप परिधान करून मी माझा फोटो फेसबूकवर अपलोड केला आणि तोच फोटो कोणीतरी पॉर्न साइटवर अपलोड केला”, असं उर्फी म्हणाली.

आणखी वाचा : ‘सैराट’ला सहा वर्ष पूर्ण, रिंकूने शेअर केलेला तो खास फोटो Viral

आणखी वाचा : “भारतात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात होणारा हिंसाचार…”, अभिनेत्री पद्मा लक्ष्मीचे ट्वीट चर्चेत

पुढे उर्फी म्हणाली, “अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हेच मला त्यावेळी माहित नव्हतं. पण कठीण परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय तुम्ही तुमच्यातील क्षमतेला आणि धैर्याला ओळखू शकणार नाही. एकतर त्याविरोधात लढा किंवा त्याचा स्वीकार करा किंवा मग जीव द्या. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात मी अयशस्वी ठरले आणि त्यानंतर मी याला लढा देण्याचे ठरवले.”

आणखी वाचा : ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होताच प्राजक्ता माळीने शेअर केली ही खास पोस्ट, म्हणाली…

उर्फीने ‘बेपनाह’, ‘बडे भैय्या की दुल्हनियाँ’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. उर्फी सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.