उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांसाठी आणि हटके फॅशनसाठी ओळखली जाते. तिचे बोल्ड आउटफिट आणि बोल्ड वक्तव्य कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी उर्फी ‘हाये ये मजबूरी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. यामध्ये तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला होता. या म्युझिक व्हिडीओतील गाणं ‘हाये ये मजबूरी’ एका जुन्या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन होतं. १९७४ साली आलेल्या ‘रोटी कपडा और मकान’ चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, उर्फीने या गाण्याच्या निमित्ताने तिच्या आणि झीनत अमान यांच्या भेटीबद्दल सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नीना गुप्ता यांना करायचाय सलमान खानशी रोमान्स; म्हणाल्या, “मला त्याच्याबरोबर…”

उर्फी तिचा अनुभव शेअर करताना म्हणाली, “मला खूप वाटत होतं की झीनत अमान जी यांनी माझं गाणं पाहावं. माझी फार इच्छा होती, त्यामुळे माझ्या गाण्याच्या लाँचसाठी टीमने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही.” टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दल वृत्त दिलंय.

हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करणारा सोहेल खातुरिया आहे तरी कोण?

उर्फी पुढे म्हणाली, “झीनत अमान यांच्यासोबतची भेट हा मला आयुष्यभर लक्षात राहील, असा क्षण होता. गाणं लाँच झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मला दुसऱ्या एका शूटसाठी गोव्याला जायचं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मी त्याच दिवशी झीनत जी यांना एअरपोर्टवर पाहिलं. मला त्यांना भेटायचं होतं, पण एवढ्या मोठ्या दिग्गज अभिनेत्रीशी बोलायची माझी हिंमत होत नव्हती. पण नंतर कशी तरी मी त्यांच्याजवळ गेले व त्यांना माझ्या ‘हाये ये मजबूरी’ गाण्याबद्दल बोलले. मला माझा व्हिडीओ त्यांना दाखवण्यासाठी वेळ मिळू शकला नाही, कारण त्या घाईत होत्या. पण गाणं रिलीज झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना भेटणं हा माझ्यासाठी खूप खास क्षण होता.”

हेही वाचा – ‘अल्लाह के बंदे’ गात प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास; कैलाश खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

उर्फी जावेद ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘बिग बॉस ओटीटी’ सारख्या रिअॅलिटी शोचा भाग राहिली आहे. नुकत्याच आलेल्या म्युझिक व्हिडीओसाठी तिच्याविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed meets zeenat aman after release of haye haye yeh majboori video song hrc