‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उर्फीने नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. यावेळी तिने आत्महत्या करण्या विषयी मोठा खुलासा केला आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले आहेत. यात उर्फीने ब्रा आणि जीन्स परिधान केली आहे. हे फोटो शेअर करत तिने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात उर्फीने तिच्या आयुष्यातील संघर्षांविषयी सांगितले आहे. हे फोटो शेअर करत “तुम्हाला माहितीये मी किती वेळा अयशस्वी झाले? मी तर आता मोजायचे सोडून दिले आहे. आयुष्यात काही वेळा मला असे वाटले की या गोंधळातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माझे जीवन संपवणे. माझ्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. अयशस्वी करिअर, अयशस्वी नातेसंबंध, पैसे नसल्यामुळे मला असे वाटू लागले की माझ्यासारख्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही”, असे कॅप्शन तिने दिले आहे.

आणखी वाचा : मालिकेत एकमेकींशी भांडणाऱ्या संजना आणि अरुंधति खऱ्या आयुष्यात मात्र…

आणखी वाचा : “कोण अक्षय कुमार…”, लग्नाची भविष्यवाणी ऐकल्यावर ट्विंकल खन्ना पडली होती गोंधळात

पुढे उर्फी म्हणाली, “माझ्याकडे अजून ही जास्त पैसे नाहीत, यशस्वी करिअर नाही आणि मी अजुनही सिंगल आहे पण तरी मला आशा आहे. मी आता जिवंत असण्याचं एकमेव कारण म्हणजे मी कधीच थांबत नाही. मी चालत राहते आणि अजुनही मी चालते. मला जिथे पाहिजे तिथे मी आता नसेन पण किमान मी माझ्या रस्त्यावर आहे. वर्ष संपण्याआधी काही पेप टॉक! उठा, लढा, पुन्हा करा. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिस्थितींपेक्षा तुम्ही स्ट्रोंग आहात.”

Story img Loader