सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. विचित्र ड्रेसिंग स्टाइल करणंही तिला आवडतं. मध्यंतरी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती फोटोसाठी कॅमेऱ्यासमोर पोझ देत असताना तिच्याच एका टीममधील मुलीने उर्फीला कोट दिला. यावेळी उर्फीचा राग अनावर झाला. आता पुन्हा एकदा तिने टीममधल्या मुलीबरोबर विचित्र कृत्य केलं आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे हेअर स्टायलिस्ट, मेकअपमन काम करताना दिसत आहेत. एक मुलगी उर्फीची हेअरस्टाइल करत असते. दरम्यान उर्फीला यावेळी राग अनावर होतो. उर्फी म्हणते, “यांना सेटवर येऊन काय होतं? तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही का? काम नसेल करायचं तर घरी जा.”
दरम्यान उर्फी जागेवरुन उठते आणि हेअरस्टाइलिस्टच्या तोंडावर पाणी ओतते. शिवाय दुसऱ्या सेकंदाला उर्फी जोरात हसू लागते. हा सगळा प्रँक आहे असं ती म्हणते. मात्र उर्फीची ही मस्ती नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. कमेंट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा उर्फीला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे.
“फक्त मस्तीमध्ये आम्ही हे सगळं केलं. ज्या मुलीच्या चेहऱ्यावर मी पाणी फेकलं तिला याबाबत आधीच पूर्व कल्पना होती. मी तिच्या चेहऱ्यावर पाणी ओतणार हे तिला माहित होतं. तुम्ही सगळ्यांनी ओव्हर अॅक्टिंग करणं बंद करा.” असं उर्फीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.