मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र प्रत्येत वेळी पुन्हा काहीतरी हटके करून उर्फी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देते. काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हजेरी लावलेल्या रणवीर सिंगनं उर्फीच्या फॅशन स्टाइलचं कौतुक केलं होतं. पण आता मात्र रणवीरला हे कौतुक महागात पडणार की काय अशी चिन्ह आहेत. उर्फीने नुकतंच रणवीर सिंगबाबत एक वक्तव्य केलं आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगने अभिनेत्री आलिया भट्टसोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. कॉफी विथ करण या कार्यक्रमात करण जोहर आलिया आणि रणवीरसोबत रॅपिड फायर राऊंड खेळला होता. यावेळी करणने रणवीरला इतर कलाकारांच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न उपस्थित केले. एकदा वापरलेले कपडे पुन्हा न वापरणारा कलाकार कोणता? असा प्रश्न करणने रणवीरला विचारला. त्यावर रणवीरने एकही क्षण न घालवता लगेचच उर्फी जावेदचे नाव घेतलं होतं. त्यानं यावेळी उर्फीच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं होतं.

आणखी वाचा- “एक दिवस मी कपडेच घालणार नाही…” उर्फी जावेदचं बोल्ड वक्तव्य

आता उर्फी जावेदनं रणवीरच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरबाबत उर्फीने बिनधास्त वक्तव्य केलं आहे. तिने थेट रणवीरला दुसऱ्या लग्नासाठी प्रपोज केलं आहे. म्हणजे एकंदर रणवीरने कौतुक केल्यानंतर उर्फी जावेद त्याच्यावर फिदा झाली आहे. रणवीरबाबत बोलताना उर्फी म्हणाली, “मी रणवीरवर प्रेम करते. तसं तर दीपिकानंतर त्याला कधी याची गरज भासणार नाही. पण त्याला जर कधी दुसरं लग्न करायचं असेल तर मी त्याची दुसरी पत्नी होण्यासाठी तयार आहे. मला असं करायला आवडेल.”

दरम्यान उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अर्थात तिच्या अतरंगी आणि शॉर्ट ड्रेसमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं मात्र उर्फी अशाप्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसते. “लोक मला ट्रोल करत असले तरीही ते माझ्या बद्दल बोलतात. नकारात्मक का असेना मला त्यातून प्रसिद्धी मिळते आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.