‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतंच एका मुलाखतीत उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. “माझ्या एका नातेवाईक कात्रीने माझे कपडे कापले होते”, असे उर्फी जावेद म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी जावेदने नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली, “माझ्या लोकप्रियतेचे संपूर्ण श्रेय हे पापाराझींना जाते. जर माझी इच्छा असती तर मी सर्व पापाराझींना घर आणि कार भेट दिली असती.”

“जेव्हा माझे लग्न होईल तेव्हा हे सर्व लोक त्यात प्रमुख पाहुणे असतील. उर्फी फोटो पोस्ट करण्यासाठी पापाराझींना पैसे देते अशा अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. मात्र त्यावर ती म्हणाली, अनेक लोक हे नेहमीच प्रश्न विचारतील. मी मेले तरी हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मला या गोष्टींची पर्वा नाही. यातीलच अनेक लोक माझ्याकडे विमान प्रवासासाठी पैसे नाहीत, हे सांगायचे. मला बोल्ड कपड्यांवर ट्रोल केले जाते. पण मी महिन्यातील दोन दिवस स्वत:साठी देते. या दिवशी मी यावरुन सतत रडत असते.”

कागदावर ‘Y’ अक्षर लिहित खासदार सुजय विखेंनी दिला मुक्ता बर्वेला पाठिंबा, फोटो व्हायरल

या मुलाखतीदरम्यानचा उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा किस्साही सांगितला. “काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे काही नातेवाईक घरी आले होते. त्यावेळी ते माझ्या कपड्यांकडे पाहत होते. मी नेहमीच असे बोल्ड कपडे घालते. मात्र त्यातील काही नातेवाईकांना माझे कपडे आवडले नाही. त्यांनी सर्व राग माझ्या कपड्यांवर काढला. त्यांनी माझे कपडे कात्रीने कापले होते. पण आज तेच नातेवाईक माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed remembers how her relatives destroyed her bold outfits nrp