सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यातील वाद सुरू झाला होता. अनेक दिवस उर्फी व चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होतं. त्यादरम्यान उर्फीने अनेक ट्वीट व इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं.
उर्फीने आता पुन्हा एक ट्वीट केलं आहे. बिहारमधील वृद्ध शिक्षकाला महिला पोलिसांकडून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उर्फीने तिच्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. “दोन महिला पोलीस अधिकारी वृद्ध शिक्षकाला त्याची गाडी हटवण्यास वेळ लागत असल्यामुळे मारहाण करत आहेत. याला म्हणतात आपल्या सत्तेचा गैरवापर करणे”, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये उर्फीने बिहार पोलीस व बिहारमधील भाजपाला टॅग केलं आहे.
नेमकं काय घडलं?
बिहारमधील कैमूर परिसरात दोन महिला पोलीस ट्राफिक हटवण्याचं काम करत होत्या. रस्ता ओलांडणाऱ्या एका वयस्कर शिक्षकाला त्याची गाडी लवकर बाजूला करता न आल्यामुळे त्या महिला पोलीसांनी त्याला मारहाण केल्याची माहिती आहे. ६५ वर्षीय वृद्ध शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी नंदिनी कुमारी आणि जयंती कुमारी या महिला पोलिसांना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा>>“घरातून लव्ह मॅरेजला…”, ‘रंग माझा वेगळा’मधील ‘दीपा’ची पोस्ट चर्चेत
दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर उर्फीने जबाब नोंदविला होता. उर्फीनेही चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत व महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.