उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. याच मुद्द्यावरून सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. पूर्वी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. नुकताच तिने जावेद अख्तर यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर आता त्यांच्यात काय बोलणं झालं हे तिने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीने जावेद अख्तर यांच्याबरोबर शेअर केला आणि लिहिलं होतं, “अखेर मी माझ्या आजोबांना भेटले, ते एक दिग्गज कलाकार आहेत. लोकांनी त्यांच्यासमोर सेल्फीसाठी रांग लावली, पण त्यांनी कोणाचंही मन दुखावलं नाही, आणि संगळ्यांशी त्यांनी संवादही साधला, हे पाहून त्यांच्याबद्दल आदर आणखी वाढला आहे.”

आणखी वाचा : Video: “कमी कपडे घालणं हा माझा…” उर्फी जावेदचा मोठा खुलासा

त्यानंतर उर्फी विमानतळावर दिसली. यावेळी तिचे फोटो काढण्यासाठी मीडिया फोटोग्राफर तिथे आले. उर्फीही हसतमुख चेहऱ्याने त्यांना भेटली. यावेळी एका फोटोग्राफरने तिला विचारलं की, “जावेद अख्तर यांच्याशी तुझं काय बोलणं झालं?” त्यावर ती गमतीत म्हणाली, “मी त्यांना म्हणाले, तुम्हाला माहिती आहे ना मी तुमची नात आहे? आता तुमच्या मालमत्तेचे तीन भाग होणार आहेत.” तिच्या या उत्तरावर सर्वजण हसू लागले.

हेही वाचा : “फडणवीसांनी मध्यस्थी करावी” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आम्हाला…”

२०२१ मध्ये उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांच्या परिवारातील आहे असा एक गैरसमज निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी तिला जावेद अख्तर यांची नात म्हणूनही संबोधलं गेलं होतं. अखेर त्यावेळी जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आझमी यांनी “उर्फीचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, उगाच खोटं पसरवू नका,” असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed shared what did she and javed akhtar talk rnv