भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने वाद सुरू होता. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकडच्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर उर्फीनेही त्यांना उत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना पत्र देत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर, उर्फीनेही ‘माझा नंगानाच सुरूच राहील’ असं म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”

वाद वाढल्यानंतर उर्फीने दोन-तीन दिवस ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. डीपी मेरी धांसू, चित्रा वाघ मेरी सासू, असंही ती म्हणाली होती. पण मागचे दोन दिवस उर्फी शांत झाली होती, तिने कोणतीही पोस्ट ट्विटरला टाकली नव्हती. तसेच चित्रा वाघ यांनीही उर्फीबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. अशातच आता उर्फीने पुन्हा एक ट्वीट केलंय. त्यात तिने तिचा बोल्ड फोटो शेअर करत फोटोला कॅप्शन द्या, असं म्हटलंय.

तिच्या या फोटोवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. ‘२ रुपये की पेप्सी, चित्रा की बहू सेक्सी’, ब्लॅक टू बेसिक्स, तू खूप सुंदर दिसतेस, तुझी सासू या फोटोला चांगलं कॅप्शन, चित्र-विचित्र, ब्लॅक ब्यूटी, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी उर्फीच्या फोटोवर केल्या आहेत.

उर्फी जावेदने शेअर केलेल्या पोस्टवरील कमेंट्स (फोटो – ट्विटर स्क्रीनशॉट)

Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद सध्या तरी शमला आहे. तसेच तिच्या या बोल्ड फोटोवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed shares bold photo on twitter after controversy with chitra wagh hrc