अतंगरी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सगळ्याचं लक्ष वेधून घेत असते. चित्रविचित्र कपडे घातल्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी मुलाखतीदरम्यान टीका केली होती.
चेतन भगत यांनी केलेल्या वक्तव्यावर उर्फी जावेदने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. “मीटू प्रकरणात अनेक महिलांनी चेतन भगतवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, हे विसरू नका”, असं तिने म्हटलं आहे.
हेही वाचा>> “तिचे फोटो लोक रात्री बिछान्यात…” चेतन भगत यांचं उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्य
हेही वाचा >> मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”
उर्फी जावेदने दुसऱ्या एका स्टोरीमध्ये “तुमच्यापेक्षा अर्ध वय असलेल्या मुलींना तुम्ही इन्स्टाग्रामवर मेसेज केले होते. तेव्हा त्या मुलींच्या कपड्यांमुळे तुमचं लक्ष विचलित झालं होतं का?”, असंही म्हटलं आहे. “बलात्कारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणं बंद करा. महिलांना त्यांच्या कपड्यांवरुन बोलणं, हे ८०च्या दशाकातील पुरुषांचे विचार होते. तुमच्यासारखे पुरुष नेहमी महिलांनाच दोषी ठरवतात. तुम्ही दरिद्री आहात यात महिलांचा किंवा त्यांनी घातलेल्या कपड्यांचा दोष नाही. उगाच मला मध्ये आणून माझ्या कपड्यांवर कमेंट करण्याची काहीच गरज नव्हती.” उर्फीने असंही पुढे म्हटलं आहे.
हेही वाचा >> “नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ
काय म्हणाले होते चेतन भगत?
चेतन भगत यांनी ‘साहित्य आजतक २०२२’ या मुलाखतीत तरुण पिढीला पुस्तक वाचण्याचा सल्ला देताना उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्यही केलं होतं. ते म्हणाले “देशातील तरुण पिढी सोशल मीडियावर उर्फी जावेदचे फोटो लाइक करत आहे. हा कोणत्या शिक्षणाचा भाग आहे का? तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये मला उर्फी जावेदचे सगळे कपडे माहीत आहेत, हे सांगणार आहात का? यात उर्फी जावेदची काहीच चूक नाही. ती तर तिचं करिअर बनवत आहे. एक सैनिक आहेत जे सीमेवर लढून देशाचे रक्षण करत आहेत. तर दुसरीकडे देशातील तरुण वर्ग रात्री बिछान्यात उर्फी जावेदचे फोटो बघत आहे. अशा तरुण वर्गाचं काय होणार? उर्फीने दोन मोबाइल फोन लावून कपडे घातले होते, हे मी पण आज पाहून आलो”.