Urfi Javed Vs Chitra Wagh Controversy: सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद ही तिच्या भन्नाट कपड्यांच्या निवडीवरून नेहमीच चर्चेत असते. उर्फीच्या कपड्यांवरून तिला आत्तापर्यंत खूपवेळा ट्रोल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ हा वाद खूप तापला आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे. या एकूण वादात आता उर्फी जावेदने शिवीगाळ करत प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल काय म्हंटल?

शी..SS अरे हे काय चाललं आहे मुंबईत. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/ मुली विकृतांच्या शिकार होत आहेत आणि ही बया अजून विकृती पसरवते आहे. असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने उत्तान कपडे घातले आहेत.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

उर्फी विरुद्ध पत्रात चित्रा वाघ यांनी लिहिले की, “केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”.

आणखी वाचा – फक्त जीन्स परिधान करत उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो; म्हणाली…

उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

उर्फी म्हणाली की, “माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या.

(फोटो: उर्फी जावेद ट्विटर)

हे ही वाचा<< “लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुमच्यासारखे राजकारणी…” चित्रा वाघ यांच्या टीकेला उर्फी जावेदचं प्रत्युत्तर

दरम्यान, उर्फीने शिवीगाळ करत केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.