‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिचा गार्डशी वाद झाल्याचे दिसते. पण या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानची बहिणी फराह खानने उर्फीच्या कपड्यांवरून केलेल्या कमेंटने वेधले. तर तिच्या या टीकेला उर्फीने सडेतोड उत्तर दिले आहे.
उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फराह म्हणाली, “हे बोलल्याबद्दल माफी मागते, पण या मुलीला घाणेरडे कपडे घातल्याबद्दल कोणी तरी फटकारले पाहिजे. लोक तिची खिल्ली उडवत आहेत आणि तिला वाटते की लोकांना तिची ड्रेसिंग स्टाईल आवडते. कोणीतरी तिला हे सांगावे अशी माझी इच्छा आहे.”
आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद
आता उर्फीने यावर उत्तर दिले. “फराह खान अली मॅम, तुम्हाला टेस्टफूल ड्रेसिंग म्हणजे काय म्हणायचं आहे? कृपया तुम्ही मला याबद्दल समजावून सांगा आणि मला हे देखील माहित आहे की लोकांना माझा पेहराव आवडत नाही. मी कोणत्या बबलमध्ये राहत नाही. पण मला कोणाच्या मताची पर्वा नाही. तुम्ही ते परिधान करता जे डिझायनरने टॅग केले आहे. मग ते टेस्टफुल आहे का? तुमचे नातेवाईक स्टार आहेत आणि चित्रपटांची निर्मिती करत आहेत. तिथे महिला आयटम नंबरसाठी लहान कपडे घालतात. तर ते खूप टेस्टफुल आहे का?, आयटम नंबर्समध्ये स्त्रीच्या शरीराला सेक्शुअलाइज करणे योग्य आहे का? चॅरिटीची सुरुवात घरातूनच होते. माफ करा, पण तुम्ही जे काही बोललात त्याची गरज नव्हती. फक्त स्टार किड्सना जे काही घालायचे असेल तेच टेस्टफुल नसते,” असं ती म्हणाली
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व
उर्फी पुढे म्हणाली, “तुम्ही म्हणालात की लोकांना माझा ड्रेसिंग सेन्स आवडत नाही, म्हणून मी बदलायला हवे. व्वा, तुमच्या कुटुंबाबद्दल बोलण्यासाठी लोकांकडे खूप काही आहे. मग ते ऐकून तुमच्या कुटुंबात बदल होतो का? स्टार किड्स देखील त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल होतात, तुम्ही त्यांना त्यांची ड्रेसिंग स्टाईल बदलण्यास सांगाल का? जगाला मी आवडत नाही म्हणून मला बदलायला सांगणे ही ८० च्या दशकातील चर्चा असल्यासारखे वाटते. उद्या लोक तुमच्या मुलांना सांगतील की त्यांना त्यांचा चेहरा आवडत नाही म्हणून त्यांनी तो बदलावा? हे काय तर्क आहे? तुझ्यासारख्या स्त्रीकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही स्लट-शेमिंग केले आहे. स्टार किड्सना सगळ्यांसमोर असा सल्ला दिला हे मी कधीच ऐकले नाही.”
आणखी वाचा : संगीत श्रेत्रासाठी दु:खाची बातमी, वयाच्या ३३ व्या वर्षी ‘या’ लोकप्रिय गायकाचे निधन
उर्फीने त्यानंतर फराह अलीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून स्क्रीनशॉट पोस्ट केला, ज्यामध्ये सुझानच्या बहीणीने बिकिनीमध्ये पोज दिली होती. हा फोटो शेअर करत उर्फीने लिहिले की, “मी महिलांचा अपमान करण्यासाठी हे करत नाही, मला फक्त हिप्पोक्रेसीचा (Hypocrisy) तिरस्कार आहे. तुम्हाला हवे ते परिधान करू शकता. तुम्ही कधीही पोस्ट करू शकता. ते टेस्टफुल आहे आणि मी जे परिधान करते ते टेस्टलेस आहे.”