नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाची हिंसक पद्धतीने सांगता झाली. ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीगिरांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसेच, विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगीता फोगट आणि विनेश फोगट यांचा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर एक फोटोदेखील प्रचंड व्हायरल होत आहे. एका फोटोमध्ये त्या हसताना दिसत आहेत, हा फोटो AI च्या माध्यमातून बनवण्यात आला असल्याचा दावादेखील केल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे एकंदरच वातावरण तापलं आहे. कुस्तीगिरांच्या या आंदोलनाला काही सेलिब्रिटीजनीसुद्धा पाठिंबा दिला होता. आता अशातच मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद हिनेसुद्धा या प्रकारावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी त्यांना शिव्या द्यायचो आणि…” अशाप्रकारे सुनील शेट्टीने केलेला अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना

या फोटोबद्दल ट्वीट करत उर्फीने लिहिलं, “लोक स्वतःचं खोटं पटवून देण्यासाठी अशा फोटोबरोबर का छेडछाड करतात? एखाद्याला चुकीचं सिद्ध करण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणं आणि खोट्याचा आधार घेणं योग्य नव्हे.” या ट्वीटबरोबरच तिने पोलिसांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

बजरंग पुनिया यांनीदेखील हा फोटो शेअर केला होता. आयटी सेलची लोकं हा फेक फोटो पसरवत आहेत आणि ज्याने हा फोटो एडिट करून पोस्ट केला आहे त्याच्या विरोधात कारवाई होईल असं या कुस्तीगिरांनी स्पष्ट केलं आहे. केवळ उर्फीच नव्हे तर कमल हासन, पूजा भट्ट, विद्युत जामवालसारख्या कलाकारांनीही कुस्तीगिरांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed speaks about morphed photo of sangeeta and vinesh phogat avn