बिग बॉस फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तोकड्या कपड्यांवरून उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलं. तसेच, उर्फीने असाच नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उर्फी जावेद समोर आली, तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला, तर तिचं थोबाड फोडणार,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यातच आता उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

हेही वाचा : “नंगानाच आणि फॅशन…”, उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहलं की, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं आहे.

“फॅशन आणि नंगानाच याच्यात…”

दरम्यान, चित्रा वाघ यांनी तुळजापूरात बोलताना उर्फी जावेदवर टीका केली आहे. “तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं पाहिजे. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करत आहे, याच्यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच याच्यामध्ये काही आहे का नाही?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

हेही वाचा : “सार्वजनिक ठिकाणी वावरताना संस्कृती जपायला हवी”; अमृता फडणवीस यांचा उर्फीला सल्ला

“ऐकलं तर ठिक आहे, नाहीतर…”

“रस्त्यावर येऊन लोकांना चेकळावयाचं काम सुरु आहे. पोलीस त्यांच काम करतील. आम्ही मात्र आमचं काम करु. ऐकलं तर ठिक आहे, नाहीतर सांगितलं आहे काय करणार आहोत. काल कोणतरी म्हटलं कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. सगळ्या अ‍ॅलर्जीच्या गोळ्या आपल्याकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed tweet chitra wagh say meri dp itni dhaasu chitra meri saasu urfi javed tweet chitra wagh controversey ssa
Show comments