टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत असणार नाही असा कोणताच दिवस नाही. नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी सध्या तिच्या नव्या म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेचं कारण ठरत आहे. ती या गाण्याचं जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. अशातच आता तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद गाण्याचं शूटिंग करत असताना झोपाळ्यावरून धपकन खाली पडताना दिसत आहे.

उर्फी जावेदचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःच शेअर केला आहे. उर्फी जावेदचं नवीन गाणं ‘हाय हाय ये मजबूरी’ काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं पण या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मात्र उर्फीबरोबर एक दुर्घटना घडली. झोपाळ्यावर उभं गाण्याचं शूट करताना तोल गेल्याने उर्फी जावेद धपकन खाली पडताना दिसत आहे. पण तिथे असलेल्या तिच्या टीमने तिला वाचवलं. हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने लिहिलं, ‘हे तर खरंच हाय हाय झालं. BTS!! #hayehayeyehmajboori’

आणखी वाचा- Mann Kasturi Re Trailer : प्रेम, रोमान्स आणि सस्पेन्स… ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? पाहा ‘मन कस्तुरी रे’ ट्रेलर

व्हिडीओमध्ये उर्फी झुल्यावर उभी असलेली दिसत आहे. तिने ऑरेंज कलरची साडी घातली आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक मुलं आहेत. उर्फी झोपाळ्यावर उभी राहून डान्स स्टेप्स करत आहे, पण अचानक तिचा तोल जातो आणि ती मागे पडते. मात्र, तिथे उपस्थित असलेले लोक लगेच तिची काळजी घेतात. त्यानंतर क्रू मेंबर्सही त्याच्याकडे धावत येतात. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही ‘बरं झालं तू सुरक्षित आहेस’ अशा कमेंट करून काळजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा- बोल्डनेसचा तडका, अतरंगी स्टाइल अन् उर्फी जावेदच्या नव्या गाण्याने प्रेक्षकांना पाडली भूरळ, कमेंट करत म्हणाले “स्टारकिड्सपेक्षा…”

उर्फीच्या कामाबद्दल बोलायचं तर २०१६ मध्ये टीव्ही मालिका ‘बडे भैया की दुल्हनिया’ मध्ये अवनी पंतच्या भूमिकेत ती दिसली होती. याशिवाय ती ‘चंद्र नंदिनी’ आणि ‘मेरी दुर्गा’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. २०१८ मध्ये तिने ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी माँ’ आणि ‘डायन’मध्येही काम केलं. २०२० मध्ये उर्फी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काही काळ काम केलं होतं. याशिवाय तिने ‘कसौटी जिंदगी की २’ मध्येही काम केलं होतं. ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाल्यानंतर मात्र ती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे.