‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. उर्फी सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने स्कीन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच या ड्रेसमध्ये ती वॉक करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ चर्चेत
या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्फीचा ड्रेस पाहून एका यूजरने ‘अंतर्वस्त्र घालायला विसरली का मॅडम?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने स्कीन कलरचा ड्रेस घातल्यामुळे सुनावले आहे.
उर्फीचा प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी उर्फीने घातलेल्या टीशर्टची चर्चा रंगली होती. उर्फीचा जवळपास प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरत असतो.