‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
उर्फीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत उर्फीने स्वत:च्याच फोटोंचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिला ही कल्पना इंटरनेटवरून आल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या या व्हीडिओला ७ तासात १ लाखा पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय.
आणखी वाचा : विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खानने केले वक्तव्य, म्हणाला…
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/03/urfi-javed-troll.jpeg?w=399)
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “काय फोटो फ्रेम बनत फिरते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ही काय पागल आहे का?” तिसरा नेटकरी म्हणाला, “या मुलीला पैशाची गरज आहे तुम्ही हिली मदत करा.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “या मुलीला रुग्णालयात घेऊन जा”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.