‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’या चित्रपटाचा जोश बॉक्स ऑफीसवर कायम आहे. तिकीटबारीवर जोरदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत १८९.९६ कोटी रुपये कमावले आहेत. अवघ्या चार आठवड्यांत ‘उरी’ने ही बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने बहुचर्चित ‘बाहुबली २’चाही विक्रम मोडला आहे. त्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल आणि ‘उरी’च्या संपूर्ण टीमसाठी या वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली असं म्हणायला हरकत नाही.
‘उरी’च्या २३व्या आणि २४व्या दिवसाच्या कमाईने ‘बाहुबली २’ला मागे टाकलं आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ने बॉक्स ऑफीसवर बरेच विक्रम केले आणि त्याचा विक्रम मोडणं ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. ‘उरी’ने २३व्या दिवशी ६.५३ कोटी रुपये कमावले तर ‘बाहुबली २’ने प्रदर्शनाच्या २३व्या दिवशी ६.३५ कोटी रुपये कमावले होते. तर २४व्या दिवशी ‘उरी’ने ८.७१ कोटी रुपयांचा आणि ‘बाहुबली २’ने ७.८० कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली आहे.
#UriTheSurgicalStrike creates HISTORY… Smashes Day 23 and Day 24 records held by #Baahubali2…
Day 23: #Baahubali2 ₹ 6.35 cr… #Uri ₹ 6.53 cr
Day 24: #Baahubali2 ₹ 7.80 cr… #Uri ₹ 8.71 cr
Now #Uri holds the record of highest Day 23 and Day 24.
MONSTROUS HIT! pic.twitter.com/mh21dFLq0z— taran adarsh (@taran_adarsh) February 4, 2019
भारतीय लष्करानं 2016 मध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. उरीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यावर उरी हा चित्रपट आधारित आहे. दर आठवड्याला नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत असताना ‘उरी’ त्यांना चांगली टक्कर देत आहे.