सिनेमाच्या जगात काहीही घडू शकते म्हणूनच तर ते जाणून घेण्यात रस आहे. उर्मिला कानेटकरबाबत काय बरे झाले आहे बघा, तिच्यावर महिला निर्मात्या आणि दिग्दर्शिका विशेष खुश आहेत असे दिसते. समृध्दी पोरे हिच्या ‘मला आई व्हायचय’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले. विशेष म्हणजे हाच चित्रपट कन्नड भाषेत निर्माण होताना पुन्हा उर्मिलालाच ती मध्यवर्ती भूमिका साकारायची संधी मिळाली.
आता दोन मराठी अभिनेत्री दिग्दर्शनाकडे वळल्या असताना त्यानी उर्मिलालाच नायिकेची संधी दिली हे विशेष. क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘काकण’ या प्रेमपटात उर्मिला नायिका आहे,  तर मनवा नाईकनेही दिग्दर्शन पदार्पणात उर्मिलालाच संधी दिली आहे.
खुद्द उर्मिलाला या विशेष गुणाची कल्पना देताच ती म्हणाली, हे योगायोगाने घडले आहे हो. मी हे मुद्दाम केलेले नाही. पण तुम्ही माझ्या हे लक्षात आणून दिलेत ते फार बरे केलेत. आता या अनुभवाकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहेन.

Story img Loader