अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे सध्याच्या अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चाही सुरु आहे. नुकंतच या सर्व चर्चांवर आदिनाथ कोठारेनंतर उर्मिलानेही प्रतिक्रिया दिली आहे.
आदिनाथ कोठारे याचा आज १३ मे रोजी वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त उर्मिलाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात पोस्टमध्ये तिने आदिनाथसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्यासोबत स्टोरीसोबत तिने त्याला खास शुभेच्छाही दिल्या आहेत.
उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”
“तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदिनाथ कोठारे. हे दिवस माझ्या अजूनही स्मरणात आहेत. तू नेहमी असाच उंच उडावास आणि तू यापेक्षाही उंच उंची गाठू शकतोस. माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा दोन्हीही तुझ्यासोबत कायम आहेत, असे त्याने ही पोस्ट टाकताना म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.
दरम्यान नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर आदिनाथ कोठारेने मौन सोडले. त्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “उर्मिला आणि माझ्यात सगळं काही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत”, असे त्याने म्हटले होते.
उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात बिनसलं? चर्चांना उधाण
“उर्मिला आणि आमच्या नात्याबद्दल या सर्व चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सध्या आम्ही दोघेही शूटींगमध्ये व्यस्त आहोत. त्यामुळे एकमेकांसोबत दिसत नाही. मात्र आमच्या दोघात सगळं छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत फार खूश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या आणि चर्चा करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही”, असे आदिनाथ म्हणाला.