मराठी चित्रपटांवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटविणारी उर्मिला कानेटकर-कोठारे ही नवीन वर्षात तिची नृत्य अकादमी सुरु करत आहे. ‘नृत्यआशा’ असे तिच्या अकादमीचे नाव आहे. उर्मिला ही स्वतः एक कथ्थक नर्तिका आहे. तिने प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. तिची ही नृत्य अकादमी येत्या २६ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती तिने सोशल मिडियावरून आपल्या चाहत्यांना दिली.

Story img Loader