मराठी चित्रपटाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाद्वारे नुकतीच तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात उर्मिलाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे आणि तो नवा चेहरा म्हणजे संहिता जोशी.
‘माधुरी’ चित्रपटासाठी संहिताची निवड करण्यासंबंधी उर्मिला मातोंडकरचा पती आणि निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, ‘‘माधुरी’ चित्रपटाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मला एक शॉर्ट फिल्म दाखवली आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये संहिताचा परफॉर्मन्स मी पाहिला आणि तिचा अभिनय पाहताक्षणीच ठरवलं की माझ्या ‘माधुरी’ चित्रपटासाठी संहिताची निवड करणार. आता मला खात्री आहे की संहिता ही मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवेल.’

या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारणार आहे. सोनाली कुलकर्णीने एकापेक्षा एक अप्रतिम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळेच ‘माधुरी’मधील सोनाली कुलकर्णींची भूमिका पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. एका अनमोल आणि सुंदर नात्यावर गुंफलेल्या ‘माधुरी’ चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
Urmila Matondkar ventures into film production… Presenting the first glimpse of her #Marathi film #Madhuri… Produced by Mohsin Akhtar under the banner of Mumbapuri Productions… Directed by Swapna Waghmare Joshi… 30 Nov 2018 release. pic.twitter.com/feZa06fcTb
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2018
#MeToo : अनू मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले
एका सुंदर नात्यावर गुंफलेला दर्जेदार, खुसखुशीत आणि सुंदर असा ‘माधुरी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजवाणी असेल. उत्सुकता वाढलेल्या या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे आणि एकूण या चित्रपटाची कथा काय आहे याविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.