आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सिनेविश्व, क्रीडा जगत, राजकारण यासह अनेक क्षेत्रातील मंडळी देशातून दाखल झाली होती. यावेळी सर्वांनी साश्रू नयनांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. देश आणि जगात नाव कमावणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. लताजींना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले असले तरी अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे. शाहरुख खानने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

“पं. दीनानाथ मंगेशकर बाजूला झाले आणि म्हणाले हिचे गाणे ऐका..”; लतादीदींच्या पहिल्या कार्यक्रमाच्या सोलापूरकरांनी जागवल्या आठवणी

शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभ्या राहिल्या, तर शाहरुख खानने प्रथम तिथे उभे राहून प्रार्थना केली, त्यानंतर मास्क खाली सरकवून त्याने खाली वाकून पार्थिव शरीरावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान पूजा ददलानीसोबत हात जोडून शरीराची प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला.

शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हजारोंच्या गर्दीत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या पार्थिवावर थुंकणे कसे शक्य आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. वास्तविक, शाहरुखने दुआचे पठण केल्यानंतर फुंकर मारली होती. मात्र आता यावरुन नवा वाद सुरु झाला आहे.

“..तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

शाहरुखला या प्रकारावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हवे होते, असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. याला थुंकणे म्हणतात का? असे ट्विट करत एका युजरने शाहरुखचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिले आहे.

…जेव्हा १९८३ विश्वचषक विजेत्या संघासाठी लतादीदींनी गाणं गात जमा केले होते पैसे; जाणून घ्या काय घडलं होतं?

“याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता,” असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक शाहरुख खानचे खूप कौतुक करत आहेत. हे फक्त राजाच करू शकतो असे चाहते म्हणतात. लता मंगेशकर यांच्या शेवटच्या दर्शनासाठी शिवाजी पार्कवर रणबीर कपूर, जावेद अख्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुराधा पौडवाल, राहुल वैद्य, विद्या बालन, राज ठाकरे यांच्यासह अनेक स्टार्स पोहोचले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila matondkar reply to those who trolled shah rukh khan over lata mangeshkar funeral abn