काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदार संघातल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर सध्या जोरदार प्रचार करत आहे. प्रचारावेळी उर्मिला यांनी लहान मुलांसाठी गाणं गात अनेकांचं लक्ष स्वत:कडे वेधलं.

बोरिवलीत प्रचारादरम्यान त्यांनी लहान मुलांसाठी ‘लकडी की काठी, काठी पे घोडा’ हे गाणं गायलं. हे गाणं उर्मिलाच्या अगदीच जवळचं आहे. तिच्या ‘मासूम’ चित्रपटातलं हे गाणं आहे. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिनं बालकलाकाराची भूमिका साकारली होती. उर्मिलानं प्रचारावेळी हे गाणं गात सर्वांचच लक्ष वेधलं छोट्या मुलांचांही चांगला प्रतिसाद तिला लाभला. यापूर्वी उर्मिलानं रिक्षा चालवत अनोख्या पद्धतीनं प्रचार केला होता. उर्मिलानं गेल्याच आठवड्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर उर्मिला मतदार संघातील प्रत्येक मतदाराची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.

‘बकबक करणे, पोपटपंची करणे ही भाजपाची स्टाईल आहे. माझी स्टाईल नेहमीच काम करण्याची आहे. मी काम करून दाखवणार आहे, तेच आश्वासन मी लोकांनाही देते आहे. माझ्या लग्नावरून आणि धर्मावरून वाद निर्माण करू पहात आहेत ते अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे लोक आहेत. मी त्यांना महत्त्व देत नाही त्यांनी केलेल्या आरोपांना मी भीक घालत नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे; असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.