झी मराठी वाहिनीवर सोमवारपासून ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा नृत्याचा रिअॅलिटी शो सुरू होत असून ‘डान्सिंग स्टार’ आणि अभिनेत्री या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा रिअॅलिटी शोची मुख्य परीक्षक म्हणून छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे.
उर्मिला मातोंडकरने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा, स्टाईलचा आणि नृत्यशैलीचा ठसा बॉलीवूडमध्ये उमटविला. अनेक भूमिकांसाठी तिची वाहवा करण्यात आली. त्यानंतर अन्य बॉलीवूड कलावंतांप्रमाणेच छोटय़ा पडद्याकडे ती वळली. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून काम केल्यानंतर आता नृत्य रिअॅलिटी शोची ‘ग्रॅण्डमास्टर’ म्हणून मराठी प्रेक्षकांसमोर येतेय. ‘रंगीला’ चित्रपटात आमिर खानसोबतच्या उर्मिला मातोंडकरने केलेल्या नृत्याविष्कारांबद्दल तिचे कौतुक झाले होते. उर्मिला मातोंडकर ग्रॅण्डमास्टर असली तरी मास्टर्स म्हणून नृत्यांगना सोनिया परचुरे, लोकनृत्यातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र शेलार आणि स्वरूप मेदारा हे तिघे आहेत. सोमवार, ३१ डिसेंबरपासून दर सोमवारी व मंगळवारी रात्री ९.३० वाजता ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ रिअॅलिटी शो दाखविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा