मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्मिला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच उर्मिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत बाळाला जन्म दिल्यानंतर एका स्त्रीला काय त्रास होतो त्याविषयी सांगितले आहे.
उर्मिलाने तिचे साडीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्मिलाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. उर्मिलाने पाठून काढलेला तिचा हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या पुढच्या बाजूला फक्त ६ महिन्यांपूर्वी पडलेले टाके आजही थंडीत ओढले जातात. समाजमान्य नाजुक बांध्याच्या व्याख्येत न बसणारा हा बांधा, नुसता आर्थिक दृष्ट्या सबळ नाही, तर गेले १५ महिने झाले एका जीवाचं वजन उचलतोय…कधी अलगद तर कधी वेदनेत”, असे कॅप्शन उर्मिलाने दिले आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ फेम बबीताने सुरु केलं रेस्टॉरंट, अभिनय क्षेत्राला करणार रामराम?
दरम्यान, उर्मिलाने बाळाच्या जन्मानंतर ‘सिझेरियन’ या विषयावर एक पोस्ट शेअर केली होती. तिचं ‘C’ section झालं असं म्हणतं उर्मिला म्हणाली, “Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत. माझ्या ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते. बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात, तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते. यांचे कारण अनुवंशिकता.”
आणखी वाचा : सुप्रिया सुळेंनी लावली होती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला हजेरी, पाहा फोटो
पुढे उर्मिला म्हणाली, “कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलिव्हरीही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे. त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. नॉर्मल असो वा सी-सेक्शन, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.” उर्मिलाने तिच्या सिझेरियन डिलिव्हरीचा हा अनुभव शेअर करत खुलेपणाने विचार मांडल्याबाबत तिचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं होतं.