भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या रुमचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ज्यावर बरेच क्रिकेटर, बॉलिवूड सेलिब्रेटी, विराटची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यसह अनेक चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सेलिब्रेटींच्या खासगी आणि वैयक्तीक आयुष्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. अशातच आता उर्वशी रौतेलानेही यावर आपली प्रतिक्रिया देत आणखी एक सवाल उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-20 विश्वचषकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात आहे. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने विराट कोहलीच्या हॉटेलच्या खोलीत परवानगी न घेता प्रवेश केला, त्याचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. आता अशा कृतीवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना राग येणं साहजिक आहे. या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशाप्रकारे व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीला खडे बोल सुनावले आहेत.

आणखी वाचा- “जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं…” विराट कोहलीच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा संतापली

यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असतानाच आता उर्वशी रौतेलानेही आपलं मत मांडलं आहे. विराट-अनुष्कानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही असं कृत्य लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीशी संबंधित ही पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत उर्शवीने लिहिलं, ‘हे खूप वाईट आणि निर्लज्जपणाचं कृत्य आहे. जरा कल्पना करा की हे सर्व एखाद्या मुलीसोबत घडलं असती तर?’

दरम्यान विराच्या रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर संतप्त पोस्ट शेअर केली होती. “याआधीही अनेकदा सांगूनही चाहत्यांनी सहानुभूती आणि दयामाया दाखवलेली नाही, याचा अनुभव आहेच. पण हे जे काही झालंय ते खूपच वाईट आहे.जे लोक म्हणतायत की तुम्ही तर सेलिब्रेटी आहात मग असं होणारच, त्यांना मी सांगू इच्छिते, की हे अतिशय वाईट आहे. एका व्यक्तीचा अपमान आणि त्याच्या प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. याचा कधीतरी तुम्हालाही सामना करावा लागू शकतो. प्रत्येकाने स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं जात असेल तर मग मर्यादा कुठे आहेत? याचाही विचार व्हायला हवा.” असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvarshi rautela post goes viral after virat kohli room video got leak mrj