चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना दुखापत होण्याच्या घटना अनेकदा घडतात. आता अशीच दुर्घटना अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत घडली आहे. तिच्या एनबीके १०९ ( NBK 109 ) या चित्रपटाच्या शूटिंगवेळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होते. ‘फ्री प्रेस जनरल’च्या रिपोर्टनुसार, उर्वशीला झालेल्या दुखापतीनंतर इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिला मोठे फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हैदराबादला या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विमानाने आली होती. एक अवघड सीन शूट करताना ही घटना घडली आहे.

उर्वशी शूट करत असलेला चित्रपट एनबीके १०९ हा तेलुगू चित्रपट असून त्यामध्ये दुलकिर सलमान, बॉबी देओल आणि नंदमुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट के. एस. रविंद्र ऊर्फ बॉबी कोल्ली दिग्दर्शित करत असून हा चित्रपट कधी रीलिज होणार त्याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

याआधी तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला होता. तिने म्हटले होते की, बालकृष्ण यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम आहे. आम्ही सहकलाकार असल्याने आमच्यातील समीकरणदेखील चांगले आहे. मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे. याबरोबरच बालकृष्ण खूप प्रेमळ आणि दयाळूदेखील आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर माझा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा ते त्याचा भाग बनले होते; अशी आठवण उर्वशीने या मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

हेही वाचा : ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याला जडलेलं सेक्सचं व्यसन; ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाला, “एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध…”

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०१३ मध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. सनी देओलची प्रमुख भूमिका असलेली ‘ सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेतून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीने पदार्पण केले आहे. उर्वशी नुकतीच ‘जेएनयू: जहांगिर नॅशनल युनिव्हसिटी’ या चित्रपटात मध्ये अभिनय करताना दिसली होती. या चित्रपटात ती कॉलेजवयीन नेत्याच्या भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट विनय शर्मा यांनी दिग्दर्शित केला असून प्रतिमा दत्ता यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, रश्मी देसाई, रवी किशन, विजय राझ या कलाकारांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याशिवाय, उर्वशी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. अनेकदा तिचे नाव रिषभ पंतबरोबर जोडण्यात आले आहे. मात्र, उर्वशी किंवा रिषभ पंत यांनी उघडपणे कोणतेही वक्तव्य केले नाही. आता उर्वशी दुखापतीतून बरी होऊन शूटिंग कधी सुरू करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader