क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचं नातं कोणापासून लपून राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांत दोघांनी एकमेकांची थेट नावं न घेता अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्या. ‘आरपी’ नावाचा क्रिकेटपटू मला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबायचा, असा दावा उर्वशीने केला. तिथपासूनच उर्वशी-ऋषभ यांच्यामधील वादाला सुरुवात झाली. आता उर्वशीने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : सोनाली फोगट मृत्य प्रकरण, पार्टीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर

२०१८ मध्ये ऋषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. मात्र सोशल मीडियाद्वारे सुरू असलेल्या वादामुळे नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध होता, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. उर्वशीने स्वतःचा बोल्ड लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत उर्वशी म्हणाली, “मी माझी बाजू न मांडता तुझी प्रतिष्ठा वाचवली आहे.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिचं हे कॅप्शन पाहून ऋषभला पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उर्वशीने सुनावलं असल्याची चर्चा आहे. उर्वशीच्या या कॅप्शनमुळे नव्याने या दोघांच्या वादाला सुरुवात होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

ऋषभने देखील काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. “लोकप्रियतेसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी लोक मुलाखतींमध्ये किती खोटं बोलतात. काही लोक प्रसिद्धीसाठी असं कसं वागतात. देव त्यांना सद्दबुद्धी देवो.” असं ऋषभने म्हटलं होतं. आता उर्वशीच्या या नव्या पोस्टला ऋषभ उत्तर देणार का हे पाहावं लागेल.

Story img Loader