बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. ज्यात तिने एका व्यक्तीबद्दल सांगितलं होतं. जो तिला दिल्लीत तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिला भेटायला आला होता आणि त्याचं नाव RP असल्याचं तिने म्हटलं होतं. ज्यानंतर उर्वशीने उल्लेख केलेला व्यक्ती म्हणजे ऋषभ पंत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. पण यानंतर मात्र ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळालं. आपल्या एका पोस्टमध्ये ऋषभने ‘ताई माझा पाठलाग करणं बंद कर’ असं लिहिलं होतं.
ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात सोशल मीडियावर वाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली एकमेकींशी बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसत आहेत. ज्यांना उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी म्हटलं जात आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन मुली एका पार्कमध्ये उभ्या राहून एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. एवढंच नाही तर काही वेळानं दोघी एकमेकींना मारू लागतात. हा एक मीम व्हिडीओ असून नेटकऱ्यांनी यातील एका मुलीला उर्वशी तर दुसरीला ईशा नेगी असं नाव दिलं आहे.
आणखी वाचा- Video: विद्या बालनलाही पडली ‘चला हवा येऊ द्या’ची भुरळ, शेअर केला भन्नाट व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ शेअर करताना आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि खिल्ली उडवताना दिसत आहेत. या मीम व्हिडीओमधून युजर्स ऋषभ पंतची अवस्था सांगत आहेत, सर्वजण या व्हिडीओचा संदर्भ काही दिवसांपूर्वीच्या ईशा नेगी आणि उर्वशी यांच्या सोशल मीडिया पोस्टशी जोडत आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
दरम्यान हा मीम व्हिडीओ सोशल मीडियावर @ankit_acerbic नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. ट्विटरवर हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तसेच या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि एक हजारांहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.