बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे. उर्वशीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच उर्वशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या केक कापण्याच्या स्टाइलमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
स्वत: उर्वशीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका शोमध्ये केक कापताना दिसत आहे. खरंतर आपण सगळेजण चाकूने केक कापतो. पण उर्वशीने मात्र तलवारीने केक कापला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
आणखी वाचा : ‘टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना…’, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
दरम्यान, उर्वशीने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने हातात ग्लोज घातले आहेत. तसेच हाय पोनी आणि ग्लॅमरस मेकअपने उर्वशीने सर्वांची मने जिंकली आहेत. उर्वशीचा हा लूक देखील चर्चेत आहे. तिच्या या ड्रेसची किंमत तब्बल १५ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
उर्वशीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘कारण प्रत्येक केक कापण्यामागे एक कारण असते. आयुष्यातील आणखी एक सुंदर क्षण. लव्ह अॅट फर्स्ट बाइट’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘तुझ्यामुळेच मला बॉलिवूड आवडत नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘केक चाकूने कापला जातो हे तुम्हाला माहितीये का?’ असे म्हटले आहे.