बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी फक्त अभिनय आणि डान्स नाही तर तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्वशीने एक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उर्वशीने तिचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशीने गोल्डन स्पोर्ट्स ब्रा आणि हायवेस्ट पॅन्ट परिधान केली आहे. या व्हिडीओत उर्वशी ५० किलोचं बार घेत बोसु बॉलवर व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘५० किलो बोसू बॉल बॅलेन्स रोइंग एक्सेन्ट्रिक इसोमेट्रिक स्प्लिट स्कॉट, हे सोप दिसतं पण हे सोप नाही,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
आणखी वाचा : शांतीच्या शोधात सारा अली खान पोहोचली लडाखला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आणखी वाचा : ती सध्या काय करते…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीबद्दल
उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान उर्वशी ‘ब्लॅक रोज’ आणि ‘तिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.