अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना भुरळ घालतो. उर्वशी सोशल मीडियावरही सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्वशी रौतेला रुपेरी पडद्यावर कमी दिसली असली तरी ती नव्या पिढीतील मुलींची नवीन फॅशन आयकॉन बनली आहे. गायक हनी सिंगच्या ‘लव्ह डोस’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्यानंतर उर्वशी लोकप्रिय झाली. तिच्या फॅशन्स सेन्सने सर्वांना भुरळ घालत असते. आता पुन्हा एकदा तिच्या ड्रेसची आणि खास करून त्याच्या किंमतीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल

अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका पार्टीत सहभागी झाली होती. तिथे तिने घातलेल्या ड्रेसने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. विदेशी ब्रँड ‘एटेलियर जुहरा’चा लाल रंगाचा ड्रेस तिने परिधान केला होता. या लाल रंगाच्या ड्रेसने तिच्या सौंदर्यात भर घातली होती.

यावेळी तिने ब्रेसलेटसह हिऱ्याचे कानातले घातले होते तर केसांचा स्लीक पोनीटेल बांधला होता. या पार्टीत तिने घातलेल्या ड्रेसची किंमत ६० लाख रुपये होती. या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर उर्वशीने घातलेल्या ड्रेसची किंमत दिसत आहे. उर्वशीच्या ड्रेसची किंमत ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : Photos: जेव्हा उर्वशी रौतेला आणि दीपिका पदुकोण विमानप्रवासादरम्यान अचानक भेटतात…

दरम्यान, उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसात बरीच चर्चेत आली होती. तिचे नाव एका पाकिस्तानी खेळाडूबरोबर जोडले गेले होते. तसंच भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशी उर्वशीचा झालेला वादही खूप चर्चेत आला होता. आता या तिच्या ड्रेसच्या किंमतीने पुन्हा एकदा तिचे नाव सर्वांच्या संभाषणात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela gained attention by wearing a dress costs 60 lakhs rnv