बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही फक्त तिच्या अभिनयासाठी नाही तर तिच्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. उर्वशीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उर्वशीचा हा व्हिडीओ व्हुप्ला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत उर्वशीच्या हातातून फोन खाली पडल्याचे दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींप्रमाणे उर्वशीही iPhone13 हा फोन वापरते. उर्वशी एका मीटिंगसाठी टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. ती गाडीतून उतरत असताना फोन तिच्या हातातून सटकला आणि खाली पडला. त्यानंतर उर्वशी जोरात किंचाळली आणि पटकन फोन उचलला.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

आणखी वाचा : “डिलिव्हरीच्या वेळी ऐश्वर्याने…”; अमिताभ यांनी केलेला तो खुलासा

दरम्यान, उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान उर्वशी ‘ब्लॅक रोज’ आणि ‘तिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘तिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकचे नाव ‘दिल है ग्रे’ आहे.

Story img Loader