अभिनेत्री उर्वशी रौतेला ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या उर्वशी ही ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. अनेक रोमँटिक कविता आणि करवा चौथ याचा संबंध क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडला जात आहे. ऋषभचे चाहतेही यावरुन तिला ट्रोल करताना दिसत आहे. मात्र आता नुकतंच उर्वशीने या सर्व प्रकरणावर मौन सोडले आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या दोघांमध्ये नेहमीच विविध कारणांमुळे चर्चा असते. त्यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्या दोघांदरम्यान रंगलेल्या इन्स्टा वॉरवरून सर्वांना त्यांच्यातील वादाची माहिती झाली. उर्वशीने एका मुलाखतीत ऋषभ पंतबद्दल अप्रत्यक्षरित्या भाष्य केले होते. त्यावेळी तिने आरपी नावाचा एक जण दिल्लीत तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मला भेटायला आला होता, असं सांगितलं होतं.आरपी म्हटल्यानंतर तो ऋषभ पंत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. यानंतर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळालं. या प्रकरणानंतर उर्वशीने ऋषभची माफीही मागितली होती.

आणखी वाचा : “ते मला धमकवण्याचा अन्…” उर्वशी रौतेलाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यानंतर आता तिच्या ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल अनेकांनी तिचे ऋषभ पंतशी नाव जोडले आहे. यानंतर अनेकांनी तिला ट्रोलही केले होते. आता या ट्रोलर्सला उर्वशीने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने ऑस्ट्रेलियाचा नकाशा शेअर केला आहे. ‘हा नकाशा खास भारतीय मीडियासाठी आहे. एकदा हा नकाशा पाहून घ्या की ऑस्ट्रेलिया किती मोठा देश आहे’, असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे.

Urvashi Rautela

आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

दरम्यान भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला काही वेळ एकमेकांना डेट करत होते. परंतु, नंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. आता तो त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे. ऋषभने उर्वशीला इन्स्टाग्रामवरून ब्लॉक केल्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

Story img Loader