बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्वशी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. बऱ्याचवेळा उर्वशी तिच्या महागड्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, यावेळी उर्वशी एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीने क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

ऋषभने नुकताच त्याचा २४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने उर्वशीने ट्वीट करत ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऋषभ पंत”, असे ट्वीट उर्वशीने केले होते. उर्वशीचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

काही वर्षांपूर्वी हे दोघे रिलेशनशिपविषयी असल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही कारणांमुळे ते विभक्त झाले असे म्हटले जात होते. यावरून आता नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “एक नेटकरी ऋषभ आणि उर्वशीचा फोटो शेअर करत फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप डाऊन होतं तर ट्वीटरवर शुभेच्छा दिल्या.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हात जोडून विनंती करतो ऋषभ पंतपासून लांब रहा.” तिसरा नेटकरी म्हणाला, “अरे अनब्लॉक कर.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “ऋषभ ती बिचारी एवढ्या प्रेमाने तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तिला रिप्लाय देऊन टाक,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : Bigg boss ott विजेती दिव्या अग्रवाल झाली तृतियपंथी?

उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान उर्वशी ‘ब्लॅक रोज’ आणि ‘तिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Story img Loader