गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि उर्वशीमधील वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आता या अभिनेत्रीचं नाव पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहसोबत जोडलं गेलं. उर्वशी आणि नसीम शाह यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या. यादरम्यान आता उर्वशी पुन्हा एकदा एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

उर्वशी रौतेलाला ओळखत नसल्याचं नसीमने स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर मात्र उर्वशीला बहुदा राग अनावर झाला. म्हणूनच तिने एक निर्णय घेतला आहे. उर्वशीने नसीमला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. पण काही रिपोर्टनुसार, उर्वशीने नव्हे तर नसीमनेच तिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं असल्याची चर्चा आहे.

उर्वशी-नसीमचं नातं आता पुन्हा एकदा इन्स्टाग्राम अनफॉलोमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर तिचे नाव नसीम शाहसोबत जोडले जात आहे. ४ सप्टेंबर रोजी ती भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहायला गेली होती. याच सामन्यातील व्हिडीओ तिने इन्साटाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नसीम शाह हसताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उर्वशीदेखील स्टेडियममध्ये बसून हसत आहे. एका फॅन पेजने बनवलेला व्हिडीओ उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून पोस्ट केला होता.

आणखी वाचा – …अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून जॉनी लिवर यांनी नम्रता संभेरावला केला फोन, अभिनेत्री म्हणते…

त्यानंतर नसीम शाहला उर्वशी रौतेलाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना “उर्वशी रौतेला कोण आहे, हे मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते याबाबत मला काहीही माहिती. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे,” असे नसीम शाह म्हणाला होता.

Story img Loader