बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळेही नेहमीच चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती सोशल मीडियावर तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. पण त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. आताही असंच काहीसं घडलं आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सध्या पुन्हा एकदा साराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा अली खाननं तिच्या चाहत्यांसाठी प्रश्नोतरांचं एक सेशन घेतलं होतं. ज्यात तिच्या चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले आणि तिनंही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्यानं साराला ‘तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रँक कोणता होता?’ असा प्रश्न विचारला होता. ज्यावर उत्तर देताना सारानं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा तिच्या स्पॉट गर्लसोबत मस्ती करताना दिसत आहे. सुरुवातीला सारा तिच्या स्पॉट गर्लसोबत फोटो क्लिक करताना दिसते आणि मग अचानक तिला धक्का देऊन स्विमिंग पूलमध्ये पाडते. त्या मुलीलाही काय घडलं हे कळत नाही. पण साराच्या या वागण्यामुळे तिला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.

साराची हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. त्यांनी तिच्यावर टीका केली आहे. एका युजरनं लिहिलं, ‘तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं सारा’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘सारा याला मस्ती नाही बेशिस्तपणा म्हणतात.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी साराच्या या व्हिडीओ कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Users angry reaction on sara ali khan shared funny video with spot girl mrj