आदित्य चोप्रा ‘बेफिक्रे’ या चित्रपटाने दिग्दर्शनात पदार्पण करतोय. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसेल. पण, गेले काही दिवस या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याबाबत चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जोडी ‘बेफिक्रे’मधून झळकणार आहे. २७ वर्षीय वाणीने २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देसी रोमा’न्स चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर गेले दोन वर्ष वाणी एकाही चित्रपटात दिसली नाही. अखेर तिची दोन वर्षाची प्रतिक्षा ‘बेफिक्रे’मुळे संपली आहे.
यासंबंधी माहिती देण्यासाठी वाणीने दोन मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. वाणी म्हणाली की, “महिन्यांचे वर्षात रुपांतरण झाले पण मी एका चांगल्या संधीची वाट पाहत होते. अनेकांना वाटले की माझे करिअर सुरु होण्यापूर्वीच संपले. पण आदिने मला खूप चांगली संधी दिली आहे. माझा स्वतःवर आणि आदित्यवर असलेला विश्वास सार्थ ठरला आहे. आदित्यने पुन्हा एकदा मला चित्रपटात घेण्याचे ठरवले ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. मला आता सर्वांच्या प्रेमाची, प्रार्थनेची आणि समर्थनाची गरज आहे. जेणेकरून मी चांगले काम करून माझे स्वप्न पूर्ण करू शकेन.”

Story img Loader