प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक, अभिनेते संतोष पवार हे दोन विनोदी अभिनेते लवकरच ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे आगामी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला आचार्य अत्रे नाटय़गृह, कल्याण येथे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून मयूरी मांगले आणि निवेदिता सराफ सहनिर्मात्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. या नाटकाची प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.